। अलिबाग । वार्ताहर ।
अष्टविनायक धोलपाडा तर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन राजिप माजी सदस्य संयज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खंडाळे ग्रामपंचायत उपसरपंच अशोक थळे, नरेश गोंधळी, माजी सरपंच कावजी, आजित माळी, संतोष कनगुटकर, माजी सरपंच संतोष गुरव, ग्रामस्थ प्रदीप खराडे, जितेंद्र थळे, सुरेंद्र वेळी, काशिनाथ वेळे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी आगरी भूषण पुरस्कारकर्ते उदय वेळे, विजय सुनील घरत, माधवी मंगेश पाटील, वैशाली मधुकर पाटील, समिर गणेश पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक यंगस्टार नेहुली या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक जय हनुमान कार्ले, तृतीय क्रमांक बहीरेश्वर नेहुली, चतृर्थ क्रमांक गणेशपुरी मधला पाडा या विजेत्या संघाचा सत्कार खंडाळा पंचक्रोशी असोसिएशनतर्फे आयोजित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांच्यातर्फे करण्यात आला.







