अश्‍विनी मोंडेचा विश्‍वविक्रम

आठ तासात 11806 बैठका पूर्ण

| पाली /बेणसे | वार्ताहर |

मोस्ट स्कॉट इन एट हावर्स फिमेल यांच्या वतीने इनफिनिटी मॉल मुंबई या ठिकाणी अश्‍विनी आनंदराव मोंडे या महिलेने शनिवारी (दि.10) बारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत तब्बल आठ तासात 11 हजार 806 बैठका करून महिला गटात जागतिक पातळीवर विक्रम करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. अश्‍विनीच्या कर्तृत्वाने रायगड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली. अश्‍विनीचे बालपण व शिक्षण मुरुड व भालगाव येथे द. ग. तटकरे माध्यमिक महाविद्यालय येथे झाले. उच्च शिक्षण इस्लामपूर आणि सोलापूर येथे पूर्ण केले. अश्‍विनीला सहा वर्षाचा मुलगा आहे त्याचे संगोपन करत तिने तिचा फिटनेस सांभाळला आहे. तिने पाहिलेले हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रशिक्षक सुनील कांबळे, डॉ. धनंजय मोरे, आदर्श सोमानी यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version