एशियन शरीरसौष्ठव स्पर्धा

सुभाष पुजारी यांना रौप्य

| पनवेल | वार्ताहर |

बाथम इंडोनेशिया येथे नुकतीच 56 वी ‌‘एशियन बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धा घेण्यात आली होती. या शरीरसौष्ठव स्पर्धेत पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी 80 किलो वरील गटात रौप्यपदक मिळविले आहे.

इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फेडरेशनच्यावतीने त्यांची भारतीय संघातून निवड करण्यात आली होती. सुभाष पुजारी हे या स्पर्धेसाठी दररोज सहा तास मिस्टर ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होते. या स्पर्धेसाठी 28 देशातील संघानी व 345 खेळाडुंनी सहभाग नोंदविला होता. सुभाष पुजारी यांनी आतापर्यंत 9 आंतरराष्ट्रीय पदकं मिळवली आहेत. या स्पर्धेसाठी त्यांना वर्ल्ड बॉडीबिल्डींगचे सेक्रेटरी चेतन पाठारे, लिगल अँडव्हायझर विक्रम रोठेव, पत्नी रागिणी पुजारी, आनंद गुप्ता व विवेक गुप्ता, डॉ. कनिष्क जैन, डॉ. असीम माथन, सुदर्शन खेडकर, ऋषी पेणकर, समीर दाभेलकर, सागर माळी यांचे विशेष सहकार्य लाभले.

सुभाष पुजारी यांच्या यशाबद्दल पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे तसेच विनय करगावकर, राजकुमार व्हटकर, निखिल गुप्ता, डॉ. आरती सिंग, प्रसाद आककानवरू, मीनाक्षी राणे, मरोळ पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी मित्र, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Exit mobile version