आंबोट गौळवाडी रस्त्याचे डांबरीकरण

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील आंबोट गौळवाडी रस्त्यासाठी पोलीस मित्र संघटना यांनी उपोषण करून पाठिंबा दिला होता. या आंदोलनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने आंबोट गौळवाडी या रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाले असल्याचे दिसून आले. दरम्यान ग्रामस्थ मनेश मसणे यांनी पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांच्या सोबत उपोषण केले होते. आंबोट गौळवाडी रस्ता गेली 25 वर्षे प्रलंबित होता. रस्त्यावर भर पावसात रस्त्यामधील खड्डयात बसून पोलीस मित्र संघटनेने आंदोलन केले होते. या रस्त्यावरुन विद्यार्थ्यांना चालणे शक्य होत नव्हते. त्याकडे स्थानिक सर्व राजकीय पक्षांचे नेते व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते. ही समस्या आंबोट गावातील मिनेश मसने आणि ईतर ग्रामस्थांनी पोलीस मित्र संघटनेकडे मांडली. पोलीस मित्र संघटनेने आंबोट गौळवाडी गावातील ग्रामस्थांसमवेत भर पावसाळ्यात तीन दिवस उपोषण केले. आंबोट गौळवाडी रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने काम पुर्ण केले. आंबोट गौळवाडी ग्रामस्थांचे करावे तेवढे कौतुक कमी आहेत. ते राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले आणि भर पावसात उपोषणात सहभागी झाले.

Exit mobile version