आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड भंडारवाडा येथील रहिवासी असणारे महेश रामकृष्ण पाटील (49) यांच्यावर हमजा कोठिवले या व्यक्तींने प्राणघातक हल्ला केला आहे. याविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, असे आहे की महेश पाटील व त्यांचा मित्र विरेंद्र दत्तात्रेय भगत हे दोघेजण मेडिकलमधून दत्तात्रेय भगत यांना इंजेक्शन देण्याकरिता मुरुड दत्तवाडी येथे जात होते. दरम्यान, रस्त्यावर गर्दी दिसल्याने ते पाहण्याकरिता महेश पाटील हे त्याठिकाणी पुढे गेले असता हमजा कोठिवले हा रिक्षावाल्याला शिवीगाळ करीत होता. यावेळी महेश पाटील त्यांचे भांडण मिटविण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, हमजा कोठिवले यांना राग अनावर होऊन महेश पाटील यांना शिवीगाळी करुन त्यांच्या हातातील मोटारसायकलच्या चावीने डोक्यात मारुन व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम होऊन तसेच उजव्या व डाव्या खांद्याला दुखापती झाली. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. जखमी महेश पाटील यांना उपचारकरिता मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतच पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ करीत आहेत. हमजा कोठिवले याला अटक करुन अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायलयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.