तिवरे प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्‍वासने हवेत

घरात अंधार, थकीत लाईट बिल शासनाने भरावे
। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर तेथील बाधित कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन केंटनरमध्ये करण्यात आले होते. येथे वीजपुरवठ्या पोटी 66 हजाराची रक्कम थकीत होती. ती प्रशासनाकडून भरण्याचा निर्णय जिल्हाच्या दिशा समितीच्या बैठकीत झाला होता. दरम्यान वीजबिल माफ होणार असल्याने पुनर्वसन कुटुबांनी खासदार तसेच राजकीय पुढार्‍यांचा सत्कारही केला. मात्र गेल्या दोन महिन्यात थकीत बिलाची रक्कम महावितरणकडे जमा झालेली नाही.

पुढान्यांनी दिलेली आश्‍वासने हवेतच विरली असून बाधीत कुटुबियांच्या घरात अंधार पडण्याचा धोका कायम राहीला आहे. तिवरे धरणग्रस्थांचे थकीत लाईट बिल शासनाने 28 जुनपर्यंत भरावे अन्यथा 29 जून रोजी काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करणार असल्याबाबतचे चिपळूण नायब तहसिलदार तानाजी शेजाळ यांना अशोक जाधव, सोनललक्ष्मी घाग महादेव चव्हाण,राजेंद्र भुरण,प्रकाश साळवी, अल्पेश मोरे,श्रध्दा कदम, अ.ल.माळी, मैनुद्यीन सय्यद, यशवंत फके आदी पदाधिकार्‍याच्या उपस्थित देण्यात आले.
तिवरे धरण फुटीनंतर धरणाच्या पायथ्याशी असलेली भेंदवाडी जमिनदोस्त झाली. दरम्यान बाधित कुंटुबियांच्या निवासाचा प्रश्‍न निर्माण झाल्यावर यातील काही कुटुबियांनी आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतला.दरम्यान या कंटेनरमध्ये महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात आला. मात्र वीजबील कोणी भरायचे यावरून थकीत विजबील वाढत गेले.थकित बिलाची रक्कम जमा होत नसल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा देण्यात आला.खा. विनायक राऊत तिवरे येथे गेल्यानंतर थकीत वीजबिलाचा भार बाधीत कुटुबांवर पडणार नसल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. जिल्हा प्रशासनाच्या दिशा समितीच्या बैठकीत तहसिल कार्यालयाने विजबिल भरण्याचा निर्णय झाला. वीज बीलाची झळ बसणार नसल्याने बाधीत कुटुबियांनी स्थानिक पुढारी व लोकप्रतिनीधीचे सत्कार केले. वाढीव बिल माफ होणार असल्याची दवंडी पेटवण्यात आली. या घटनेला दोन महिने झाले तरी थकीत बिलाचा पत्ता नाही. 66 हजाराची थकित बिल आता 70 हजारावर पोहोचले आहे. पं. स.सदस्य राकेश शिंदे यांनी गेल्या मासिक सभेत आपल्या गणातील थकित बिलाचा मुद्दा मांडला होता. त्यावर झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत महावितरणचे पालशेतकर यांनी तिवरे पुनर्वसन वसाहतीतीत थाकीत बिलाची रक्कम महावितरणकडे जमा झालेली नाही.तसेच याविषयीचा पत्रव्यवहारही आमच्याकडे कोणी केलेला नाही . आता थकित बिलाची रक्कम 70 हजारवर पोहोचली आहे . त्यामुळे राजकीय पुढार्‍यांनी दिलेली आश्‍वासने हवेतच विरल्याचे दिसून आलेले आहे.

Exit mobile version