| उरण | वार्ताहर |
गेली अनेक वर्षे 22 गाळे धारक व्यवसायिकांनी आप आपल्या गाळ्यांचे भाडे हे उरण नगर पालिकेकडे जमाच केले नाही. त्यामुळे भाडे तत्वावरील एकूण 11 लाखांची रक्कम गाळे धारकांकडे थकीत राहिले आहेत.त्या वसुलीसाठी उरण नगर पालिकेने सदर गाळे धारक नोटीस बजावली आहे.बजावण्यात आलेल्या नोटीसीच्या मुदतीत गाळे धारकांनी थकीत भाड्याची रक्कम न भरल्यास सदर गाळ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.
नगर पालिकेने बाजारपेठेतील आपल्या ताब्यातील 22 गाळे हे गरजूंना भाडे तत्वावर दिले आहेत. 22 गाळे धारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरावी अन्यथा पालिका संबंधित गाळे धारकांवर बडगा उगारणार असल्याच्या सूचना सदर गाळे धारकांना देण्यात आलेल्या नोटीसा व्दारे बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदर गाळे धारक व्यावसायिक थकीत भाड्याची रक्कम केव्हा अदा करते की आपल्यावर होणार्या कारवाईला सामोरे जाते याकडे भाडे भरणा करणार्या इतर व्यावसायिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
गाळे धारकांकडे थकीत भाड्याची रक्कम ही 11 रुपयांची आहे.ती थकीत भाड्याची रक्कम उरण नगर पालिकेकडे जमा करावी यासाठी संबंधित गाळे धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.न पेक्षा उरण नगर पालिका सदर गाळ्यावर कारवाई करणार आहे. – राहुल इंगोले – मुख्याधिकारी