| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते.
गणेशपुजनानं या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर 12 वाजून 29 मिनिटांनी हा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. 84 सेकंदाच्या अभिजात सुक्ष्म मुहूर्तावर हा विधी संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरावर पुष्पवर्षाव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर दिग्गजांनी हजेरी लावली.
अनेक सेलिब्रेटिंची हजेरी या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रेटिंनी देखील हजेरी लावली. यामध्ये अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, रजनीकांत, कंगना रणौत, अलिया भट, रणबीर कपूर, रामचरण, व्यंकटेश प्रसाद, रोहित शेट्टी, चिरंजीवी, माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने, कतरिना कैफ, विकी कौशल, आयुष्यमान खुराना, अनुपम खेर, राजकुमार हिरानी, मनोज जोशी यांसह इतरही अनेक सेलिब्रेटिंनी या सोहळ्याला हजेरी लावली.