सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू बनणार करोडपती

अजित पवारांची बजेटमध्ये मोठी घोषणा

| मुंबई | वृत्तसंस्था |

महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज पुढच्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पातून क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची कामगिरी उंचावण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या.

खेळाडूंसाठी ’मिशन लक्षवेध’ योजनेअंतर्गत राज्य स्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र, जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी खेळाडंसाठी त्रिस्तरीय प्रशिक्षण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यासोबत आशियाई स्पर्थेत ज्या खेळाडूंना सुवर्णपदक मिळाली आहे, त्यांना सरकार 1 कोटी देणार आहेत, तर रजतपदक जिंकणार्‍या खेळाडू 75 लाख आणि कांस्यपदक, विजेत्या खेळाडूंना 50 लाख रुपये बक्षिस देण्याची घोषणा यावेळी महाराष्ट्र विधिमंडळात आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

यासोबत अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी यांना विकासाची संधी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version