माथेरान शहरात एटीम सेवा सुरु

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान नागरी पतसंस्थेच्या 85व्या वर्धापन दिन सोहळ्यात एटीएम सेवा सुरु करण्यात आली. माथेरानमध्ये बाजारपेठ भागात पतसंस्थेचे मुख्य कार्यालय असून त्याठिकाणी ही सेवा सुरु करण्यात आली. या सेवेचा सर्वाधिक फायदा पहिल्याच दिवशी पर्यटकांनी घेतल्याचे दिसून आले असून माथेरान येथील दस्तुरी नाका येथे देखील माथेरान नागरी पतसंस्थेने अशी सुविधा सुरु करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

यासेवेचे उद्घाटन माथेरान नागरी पतसंस्थेचे सभापती अजय सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी उप सभापती विनंती घावरे, प्रसाद सावंत, विवेक चौधरी, कुलदीप जाधव, विजय कदम, गाजणाना आबनावें, सचिन दाभेकर, रामचंद्र ढेबे, नितीन शेळके, चंद्रकांत काळे, निसार शारवान, विजय सावंत, स्वाती कुमार, अनिल गायकवाड, गिरीश पवार, योगेश जाधव आदींसह सर्वपक्षीय नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version