बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमचे तिनेतेरा

। कोलाड । वार्ताहर ।

कोलाड (वरसगांव) नाका येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम हे एक महिन्यांपासून बंद असल्यामुळे येथील बँक खातेदारांची गैरसोय निर्माण झाली आहे. यामुळे येथील नागरिकांकडून संताप व्यक्त करत आहेत.

सद्या शाळा सुरु झाली असुन शालेय वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच पावसाळा सुरुवात झाला असल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीची कामे ही सुरु केली आहेत. यामुळे शेतकरी वर्ग बी बीयाणे व खते खरेदी करण्यासाठी बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी करीत आहते. तसेच, या बँकेचे एटीएम बंद असल्यामुळे त्वरित पैसे काढण्यासाठी गैरसोय निर्माण झाली आहे.

बँकेत जाऊन बँक खातेदाराला ठराविक वेळेतच पैसे काढता येतात. परंतु, आधुनिक काळातील धावपळीच्या युगात एटीएम कार्डमुळे कोणत्याही वेळी तसेच कोणत्याही ठिकाणच्या बँकेत जाऊन पैसे काढता येतात. असे असले तरी इतर बँकेच्या एटीएममध्ये जाऊन पैसे काढले तर बँक खातेदाराला जादा चार्जेस भरावे लागत आहे. यामुळे याचा फटका बँक खातेदाराला बसत आहे. यामुळे कोलाडमधील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम त्वरित सुरु करावे, अशी मागणी बँक खातेदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version