खोपोली | प्रतिनिधी |
खोपोलीतील साजगाव विठ्ठल मंदिराच्या समोरील रोडलगत झोपडपट्टीत राहणार्या महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपीदेखील त्या परिसरात राहणारा असून, अनेक दिवसांपासून वाईट नजर ठेवून होता. पीडित महिला एकटीच असल्याचे पाहून दुपारी चारच्या दरम्यान झोपडीत शिरून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो फरार झाला होता. आरोपीला खोपोली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सपोनि शंकर आंधळे हे करीत आहेत.
साजगाव येथे महिलेवर अत्याचार
