गणपत गायकवाडांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

| ठाणे | प्रतिनिधी |

शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार केलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हिल लाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शेतकऱ्यांनी दाखल केला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या न्यायालयाने गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत 11 दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिल लाईन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यासह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, नगेश वारघेट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस या प्रकणाचा तपास करत आहेत.

Exit mobile version