| मुंबई | प्रतिनिधी |
मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनमध्ये निकृष्ट अन्न दिल्याची तक्रार करत आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. आमदार गायकवाड यांनी बनियन आणि टॉवेलवर कँटीनमध्ये येऊन संतप्त होत कर्मचाऱ्याला फिल्मी स्टाईलने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचे पडसाद विधिमंडळातही उमटले. त्यानतंर मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. अखेर शुक्रवारी मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






