अल्पवयीन मुलीवर हल्ला; आरोपीस 6 वर्षे 7 महिने सक्तमजुरी

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आरोपीस 6 वर्षे 7 महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना दि. 27 ऑगस्ट 2019 रोजी सावंतकोंड येथे घडली होती. आरोपी शुभम गजानन वनारसे (रा. खडकवणे, पोलादपूर) याने पीडितेवर चाकूने वार करून गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर न्यायालयाने आरोपीस पोक्सो कायद्यान्वये दोषी ठरवत आठ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

Exit mobile version