एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला

| महाड । प्रतिनिधी ।

महाड येथे महाविद्यालयासमोर एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर तरुणाने चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा झाला असून हल्ला करणार्‍या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत.

महाड जवळ मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यायाकडे जाणार्‍या उड्डाण पुलावर सकाळी सव्वा अकरा वाजता महाविद्यालयातील 16 वर्षीय तरुणीवर हल्ला होण्याची घटना घडली. हल्ला करणारा तरुण पळून गेला असून त्याचे नाव सारळ सुनील शिंदे असे असून त्याचा तपास पोलिस करत आहेत. जखमी झालेली तरुणी महाविद्यालयात जात असताना तिची वाट अडवून या महाविद्यालयीन तरुणाने धक्काबुक्की करत सोबत आणलेल्या काचेच्या बाटलीने हल्ला केला. यामधे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून महाड शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी तरुणावर महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version