| महाड | वार्ताहर |
महाड तालुक्यातील एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर प्राणघातक हल्ला करणार्या त्या नराधम तरुणाला कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी महाड भाजपा महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. त्याच बरोबर पिडीत तरुणीच्या पालकांची भेट घेऊन त्यांना धिर दिला.
आंबेडकर महाविद्यालयातील 11 वी मध्ये शिकणार्या एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून सारळ शिंदे वय 20 या तरुणांने काचेच्या बाटलीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सदर तरुणी ही वाचली असुन तिच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान गुरुवारी हेमाताई मानकर, डॉ मंजुषा कुद्रीमोती, निलिमा भोसले, दिप्ती नकाशे ,नमिता दोशी, प्राजक्ता दळवी, सुजाता माने, अश्विनी मोरे, जिगेशा बुटाला, रुपाली पवार यांनी आज महाड ग्रामीण रुग्णालयात जाऊन सदर पिडीत तरुणीची भेट घेतली. तसेच तिच्या आई वडिलांना भेटून त्यांना धीर दिला. महाड शहर पोलिस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन सदर नराधाम आरोपीस कठोर शासन होण्याची मागणी केली.