। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बोरीवली गावासमोरील नेवीताड, डीस्टीलर्स प्रा.लिमीटेड कंपनीच्या गेटवर सुरक्षारक्षकाला मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला.
घटनेतील आरोपीला दारूच्या दोन बाटल्या चोरी केल्याच्या संशयावरून कामावरून काढण्यात आले होते. याचाच राग धरून आरोपीने कंपनीच्या गेटवर गैरकायद्याची मंडळी जमवून गेटवरील सुरक्षारक्षकांना फिर्यादीच्या नावाने शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर कंपनीच्या आवारात विनापरवानगी प्रवेश करून फिर्यादी यांना मारहाण करण्यासाठी त्यांचा शोध घेतला. परंतु, फिर्यादी न सापडल्याने त्यांच्या मोबाईलवर संपर्क करून शिवीगाळ तसेच दमदाटी केली. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सुरक्षारक्षकाला मारहाणीचा प्रयत्न
