पुण्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न

| पुणे | वृत्तसंस्था |

पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमामधून तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र सुदैवाने ही घटना टळली आहे.

इयत्ता 11वी मध्ये शिकत असलेल्या मुलीला भररस्त्यात आडवून तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. ही मुलगी आरोपीशी बोलत नव्हती म्हणून तिच्यावर हल्ला करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान मुलगी व तिच्या तीन मैत्रिणी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक 6 येथून जात होत्या. यादरम्यान महेश व त्याचा मित्र येथे आले. आरोपीने मुलीला कोयता फेकून मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपी पडलेला कोयता उचलण्यासाठी बाईकवरुन उतरला. त्याने रस्त्यावर पडलेला कोयता उचलला. पण घटनास्थळी असलेल्या एका महिलेने आरडाओरड केला. लोक जमा होऊन आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणामध्ये खडक पोलीस ठाण्यामध्ये आरोपी महेश सिद्धप्पा भंडारी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे.

Exit mobile version