खोपोली सुभाषनगरमधील घर मध्यरात्रीच्यावेळी पेटवून देण्याचा प्रयत्न

घराच्या बाहेरील कड्या लावून केला कटकारस्थान,नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

खोपोली | संतोषी म्हात्रे |

खोपोली शहरातील सुभाषनगर येथील रहिवासी अनिकेत आनंदराव खेडकर यांचा घर जाळण्याचा प्रयत्न सोमवार दि.२१ डिसेंबर रोजी मध्यरात्री रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास शेजारी घरांच्या घड्या लावून तीन दरवाजावर,खिडक्यांवर रॉकेल टाकूण आग लावली असता धुरांचे लोट पाहून शेजारील नागरिक सतर्क झाल्यामुळे आग विझवून अनिकेतसह आई,भावाल सुखरूप पणे बाहेर काढले पोलीस स्टेशन ला संपर्क केल्यावर  पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पाहणी करीत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खोपोली सुभाष नगर येथील गणेश मंदिर परिसरात  अनिकेत आनंदराव खेडकर (वय-26) हे लहान भाऊ अक्षय (वय-23) व आई हेमलता खेडकर (47) यांच्यासह राहतात. सोमवार (दि. 20) रोजी रात्री दोन-अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या घराला बाहेर कडी लावून राँकेल आणि कपड्याङे बोळे करून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजूबाजूच्या घरांनाही बाहेरून बंद केले, तसेच गणेश मंदिरातील लाईट बंद करून खिड़की, दरवाजे व भिंतीवर डिझेल तसेच शेजाऱ्यांचे बाहेर वाळत टाकलेले कपडे यांना आग लावून घर जाळण्याचा प्रयत्न केला. या आगीत मागच्या बाजूचा दरवाजा काही प्रमाणात जळाला आहे. ऐवढेच नव्हे तर खिडक्यावर जळालेले कपडे, तसेच डिझेलचे डाग दिसून येत आहेत. खेडकर कुटुंबीय आत झोपले होते. दरम्यान, काही अंतरावरील शेजाऱ्यांनी आग पाहून गोंधळ केल्यावर आजूबाजूचे लोक जागी झाले व त्यांनी आग विझवली, तसेच खेडकर कुटुंबियांना घराबाहेर काढण्यात. सुदैवाने यात जिवितहानी झाली नसली तरी सुभाषनगर परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत तक्रार अनिकेत आनंदराव खेडकर खोपोली पोलिस ठाण्यात केली असून अकस्मात अग्नी र.जि.नं-११/२०२१ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरिक्षक शिरिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहय्यक पोलिस हरेश कळसेकर, तपास करीत आहेत.

Exit mobile version