। नागपूर । वृत्तसंस्था ।
एका 25 वर्षीय गर्भवती महिलेने यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वतःहून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शहरातील यशोधरा नगर परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब खान नावाचा इसम 2016 पासून लग्नाच्या बहाण्याने संबधित महिलेवर बलात्कार करत होता. जेव्हा ती गर्भवती झाली, तेव्हा खानने तिला यूट्यूब व्हिडिओ पाहून आणि त्यात नमूद केलेली औषधे घेऊन गर्भपात करण्यास सांगितले. शोएब खानवर बलात्कार आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.