| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
मुलांच्या भांडणाचा राग मनात धरून सख्ख्या भावाने सख्ख्या भावावर चाकूने वार करत त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात 6 डिसेंबर रोजी उसामा दस्तगीर सुबेदार (नॅशनल हॉटेलसमोर, तळोजा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हुजेफा दस्तगीर सुबेदार हा पत्नी आणि मुलांसह तळोजा येथे राहतो. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्याचा मुलगा उस्मान आणि भाऊ उसामा यांचा मुलगा हुसेन यांच्यात खेळत असताना वाद झाला. यावेळी मुलांमध्ये झालेला भांडण्याचा वाद मिटवून घेतला. 6 डिसेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास हुजेफा हा मुंबई येथे जात असताना त्याचा भाऊ उसामा याने माझ्या पत्नीला शिवीगाळ का केली, तुला मारून टाकेल असे बोलून लोखंडी सूऱ्याने हुजेफा याच्या पाठीवर डाव्या हाताच्या काखेत आणि डोक्याच्या पाठीमागे वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर उसामा तेथून पळून गेला. जखमीवर खारघर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भावावर चाकूचा वार करत हत्येचा प्रयत्न
