। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग परहूर येथे प्रेयसीच्या नवर्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. फिर्यादी रा.हनुमान नगर, पो.हशिवरे, हे पत्नीच्या सांगण्यावरुन मोटारसायकल घेऊन तिला न्यायला परहुर पाडा येथील एम.आय.डी.सी रोडने जात असताना फुफादेवीचा पाडा, रेवस, येथील आरोपीने त्याच्या व फिर्यादी यांच्या पत्नीच्या असलेल्या प्रेम संबंधांमुळे फिर्यादी यांच्या मोटार सायकलला पिकअप टेंम्पोने ठोकर मारुन फिर्यादींना ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.