| चणेरा | सत्यप्रसाद आडाव |
रायगडमध्ये पनवेल येथे शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन पनवेल येथे 2 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून, त्या पार्श्वभूमीवर शेकापच्या वतीने सर्व तालुका स्तरावर जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच नेते मंडळी या याबाबत आढावा बैठकीतून मौलिक मार्गदर्शन करत वर्धापनदिनी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी केले. रोहा तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन पनवेल येथे 2 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या अनुषंगाने रोहा शासकीय विश्राम येथे रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील पदाधिकारी यांची आढावा बैठक पार पडली. पक्षाचे सर्वेसर्वा नेते सरचिटणीस जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीला यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शे.का.प. महाराष्ट्र राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, ॲड. गौतम पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरराव म्हसकर, रोहा तालुका चिटणीस शिवराम महाबळे, संतोष जंगम खालापूर, शिवानी जंगम माजी नगराध्यक्षा खालापूर, आरडीसीसी बँक संचालक गणेश मढवी, मजूर फेडरेशन अध्यक्ष हेमंत ठाकूर, तालुका सरचिटणीस विनायक धामणे, तालुका कार्यालीन चिटणीस संदेश विचारे, युवा पुरोगामी अध्यक्ष संतोष दिवकर, उपाध्यक्ष अमोल शिंगरे, विठ्ठल मोरे, वि.वि.ध. कार्यकारी सोसायटी अध्यक्ष गोपीनाथ गंभे, उपाध्यक्ष विकास भायतांडेल, सुरेश कोतवाल, तालुका महिला आघाडी अध्यक्ष कांचन माळी, प्रताप देशमुख, राम गिजे, बाळा धनावडे, मनोहर महाबळे, समीक्षा यादव, माजी सरपंच शेणवई रूपाली मढवी, नरेश बैकर, ॲड. सचिन जोशी, सहप्रमुख नेतेमंडळी आदींसह तालुक्यातील शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
या आढावा बैठकीत यावेळी सुरेश खैरे, सुप्रिया पाटील, ॲड. गौतम पाटील, शिवानी जंगम, शंकरराव म्हसकर, गणेश मढवी, शिवराम महाबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर पक्षाचा वर्धापन दिन हा जणू काही पंढरीच्या विठुरायाची वारी हीच भावना प्रत्येक कार्यकर्ता मनात घेऊन येतात तसेच चांगले विचार घेतात आणि त्यातूनच कार्यकर्ता घडतो. शेतकरी कामगार पक्ष आणि रायगड हे समीकरण गेली अनेक वर्ष कायम राहिले होते. श्रमजीवी, कष्टकरी, शेतकरी, शेत मजूर, कामगार गोर गरिबांना जो हवा तो न्याय मिळवून देणारा पक्ष अनेक शेकऱ्यांसाठी संघर्षाचा लढा देत त्यांना शेतजमीन मिळवून देणारा पक्ष आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात एकेकाळी विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शेकापची पूर्ण महाराष्ट्रात राजकीय ताकद होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने काम करा, येत्या काळात पुन्हा तेच आपले दिवस येतील या हेतूने ताकदीने उभे राहू पक्ष संघटना वाढवून येणाऱ्या जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, निवडणुकीत सामोरे जावे लागणार असून, त्यात आपला विजय निश्चित करण्याची संधी मिळाली आहे, असे शेवटी सुरेश खैरे यांनी सांगितले.
शेकापच्या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा: सुरेश खैरे
