नारायण राणेंची हजेरी ; रायगड पोलिसांनी नोंदविला जबाब

कोणतेही व्हॉईस सॅम्पल घेतले नाही
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नाराण राणें यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. महाड न्यायदंडाधिकार्‍यांनी राणेंना सशर्त जामीन मंजूर केला असला तरी 30 ऑगस्ट व 13 सप्टेंबर रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार नारायण राणे यांनी सोमवारी रायगड पोलिसांकडे हजेरी लावली. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. मात्र, त्यांचे कोणतेही व्हॉईस सॅम्पल घेतले नाही.
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. राणे यांना महाड पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने राणे यांना काही अटी, शर्तींवर जामीन मंजूर केला होता. 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर अशा दोन दिवस राणे यांनी रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात हजेरी लावावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. 30 ऑगस्ट रोजी प्रकृती ठिक नसल्याचा अर्ज राणे यांच्या वकिलांनी रायगड पोलिसांना देत राणे गैहजर राहिले होते. 13 सप्टेंबरला राणे हजेरी लावणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.



15 मिनिटांचा जबाब
नारायण राणे जुहू येथील निवास्थानातून सोमवारी दुपारी 12 वाजता अलिबागकडे रवाना झाले. दुपारी ठिक अडीच वाजता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजर झाले. अवघ्या 15 मिनिटांतच पोलिसांनी त्यांची हजेरी घेत जबाब नोंदवला. त्यानंतर राणे बाहेर पडले.

मागच्या वेळी येणे शक्य नव्हते. याची कारणे लेखी स्वरुपात दिली होती. नारायण राणे यांचा जबाब नोंदवला आहे. त्यांची जी चौकशी करायची होती, ती त्यांनी केली. आम्ही पोलिसांना सहकार्य करु, व्हॉइस सॅम्पल घेतले नाही. पुढची तारीख काही सांगितलेली नाही.
संग्राम देसाई, राणेंचे वकील

Exit mobile version