आत्मक्लेश यात्रेची मुख्यमंत्र्यांकडून दखल

| पनवेल | वार्ताहर |

सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित नागरी प्रश्‍न तातडीने सुटावेत यासाठी सोलापूर ते मुंबई असा पायी चालत आलेल्या 72 वर्षीय अर्जुन रामगिर यांच्या आत्मक्लेश यात्रेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री ठाण्यात त्यांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. तसेच शक्य ते सारे प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन त्यांना दिले.

रामगिर पनवेलपर्यंत चालत आल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्याच वेळी ते मुंबईकडे चालत येत असल्याची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर गेली. त्यांनी तातडीने त्यांच्या याची दखल घेऊन पनवेलमधील अ‍ॅड. प्रथमेश सोमण यांना त्यांची विचारपूस करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची विचारपूस केली त्यांच्यावर प्रथमोपचार करून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार त्यांना गाडीत बसवून वर्षा बंगल्यावर आणून त्यांना जेवू खाऊ घातले. त्यानंतर ठाणे येथे त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिर यांचं म्हणणं सविस्तरपणे समजून घेऊन ते लेखी देण्यास सांगितले.

यावेळी अ‍ॅड. प्रथमेश सोमण, रामगिर यांचे सहकारी संजय थोबडे तसेच पनवेलमधील सर्व शिवसैनिक देखील उपस्थित होते.

Exit mobile version