वडखळ ग्रामपंचायतीकडे तालुक्याचे लक्ष

| पेण | प्रतिनिधी |

येऊ घातलेल्या 5 नोव्हेंबरला पेण तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींपैकी पेण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेली ग्रामपंचायत म्हणजे वडखळ ग्रामपंचायत. वडखळ ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षात सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपा वरून सरपंच राजेश मोकल यांना पाय-उतार व्हायला लागले होते. तसेच आपले सरपंच पद वाचावे म्हणून राजेश मोकल यांना वेगवेगळया पक्षांची वारी करावी लागली होती. त्याचप्रमाणे अविश्वासाच्या ठरावा सामोरे देखील जावे लागले होते. यावेळी सदस्यांच्या अविश्वासाच्या ठरावामुळे राजेश मोकल यांचा पराभव झाला परंतु जनतेच्या दरबारात त्यांनी आपली खुर्ची चालविली.

एक ना अनेक भांनगडी वडखळ ग्रामपंचायतीच्या गेल्या पाच वर्षात पेणकरांना पहायला मिळाल्या. एकूणच राजेश मोकल विरुध्द निवडून आलेले काही सदस्य यांचा सामना रंगला. शेवटी राजेश मोकल यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्र.3) कलम 39 (1) नुसार कारवाई झाली, आणि त्यांना सरपंच पद गमवावे लागले. त्यातच फक्त पद गमवावे लागले नाहीत तर त्यांना पुढे निवडणुक लढवण्यास सुध्दा मज्जाव केला आहे. राजेश मोकल यांनी या बाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु, उच्च न्यायालयात अजुन सुनावणी झाली नाही. त्यातच राजेश मोकल यांनी एमआयडीसी व्हावी म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधात प्रसार माध्यमांना माहिती देउन एमआयडीसी विरुध्द लढणारे ज्येष्ठ आमदार भाई जयंत पाटील यांच्या बाबत अपशब्द काढले होते. याचा देखील या निवडणूकीवर परिणाम पहायला मिळणार आहे. राजेश मोकल यांनी आपल्या पत्निला थेट सरपंचाचे उमेदवार म्हणून घोषित करून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यातच राजेश मोकल यांच्या राजकीय वाऱ्या पाहता कॉग्रेस, भाजप, राष्ट्र वादी कॉग्रेस, नंतर पुन्हा भाजप या बाबींमुळे वरिष्ठ नेत्यांचा विश्वास राजेश मोकल यांनी गमवला आहे.

भाजप मध्ये शेवटचा प्रवेश केला त्या वेळेला स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी त्यांचा प्रवेश नाकारला होता नंतर रविशेठ पाटील यांची मनोधरणी करून दोन ते अडिच तासा नंतर त्यांना प्रवेश दिला होता. त्यातच राजेश मोकल यांच्या विरुध्द ज्यांनी दंड थोटावले आहेत ते म्हणजे प्रभाकर म्हात्रे, योगेश पाटील, मिलिंद मोकल, सनिल जांभळे, रवि म्हात्रे, निलेश म्हात्रे, हे सर्व पक्षिय कार्यकर्ते आहेत यामध्ये निलेश म्हात्रे हे जरी कॉग्रेसचे असले तरी त्यांनी एमआयडीसी विरुध्द मोठा लढा उभारला आहे तसेच ते आमदार भाई जयंत यांचे विश्वासू व निकटवर्तीय आहेत. तर योगेश पाटील आणि प्रभाकर म्हात्रे हे आमदार रविशेठ पाटील यांचे जवळचे आहेत. तर मिलींद मोकल हे शिवसेना उबाठा गटाचे उध्दव ठाकरे यांच्या विश्वासातले आहेत. एकंदरीत राजेश मोकल यांना चारही बाजुने घेरण्यासाठी सर्वजण सज्ज होउन श्री क्षेत्रेश्वर जनमत विकास आघाडीची स्थापना केली आहे. तर राजेश मोकल यांनी श्री क्षेत्रेश्वर विकास आघाडी निर्माण करून निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे. या वडखळ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये साम-दाम-दंड-भेद या नितीचे अवलंब दोन्ही बाजुंनी आपल्याला पहायला मिळणार हे नक्की.

Exit mobile version