कृषीवलच्या वृत्ताची दखल; अखेर टाकाचीवाडीमध्ये पाणी पोहचले

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील दामत भडवळ ग्रामपंचायत मधील टाकाचीवाडी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. स्थानिक ग्रामस्थ वामन वाघ तसेच ग्रामपंचायत सदस्य किशोर घारे यांनी आदिवासी ग्रामस्थांसह कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली होती. त्यावेळी आमदार थोरवे यांनी युवासेनेचे प्रसाद थोरवे यांना टाकाचीवाडी येथे पाठवून पाण्याचा तात्पुरता प्रश्‍न सोडविण्याची सूचना आलेली होती.दरम्यान,आमदारांच्या सूचनेची तात्काळ अंमलबजावणी झाली आणि टाकाचीवाडी येथील आदिवासी वाडीला पाणी पोहचले आहे.
भडवळ टाकाचीवाडी गावाच्या अलीकडे ग्रामपन्चायत ने खोदलेली बोअरवेल होती. त्या बोअरवेलला असलेला हॅन्डपंप अनेक वर्षे नादुरुस्त अवस्थेत होती..त्या बोअरवेलमध्ये भरपूर पाणी असल्याने ग्रामस्थांनी सूचना करून त्या बोअरवेल मधून पाणी वाडीपर्यंत नेता येईल अशी माहिती आमदारांना दिली.त्यानंतर युवासेनेचे प्रसाद थोरवे हे तात्काळ आपले सहकारी अंकुश शेळके,अंकुश दाभणे,सुभाष मिणमिणे,गोपीनाथ राणे,वामन वाघ किशोर घारे,रोहन पाटील,दिनेश माळी,भगवान जामघरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते टाकाचीवाडी येथे पोहचले.तेथे येथून समर्सिबल पंप,पाईप,वीज वाहिनी आदी साहित्य आणले.ते साहित्य बंद पडलेल्या बोअरवेल मध्ये पाठवले आणि बोअरवेल मधून पाणी बाहेर काढले. ते पाणी टाकाचीवाडी मध्ये पोहचवले आणि आदिवासी ग्रामस्थ आनंदले.
वाडीमध्ये पाणी पोहचल्यानंतर वामन वाघ,प्रकाश शिंगवे,चंद्रकांत वाघ, सीताराम केंगे यांनी गावासाठी पाणी पोहचवणार्‍या कार्यकर्त्यांचे आभार मानले.त्याचवेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून टाकाचीवाडी येथे नवीन स्वतंत्र नळपाणी योजना राबविण्याचे आश्‍वासन दिले आहे.मात्र आमदार महेंद्र थोरवे यांनी ताकाची वाडीच्या ग्रामस्थांची तहान भागवण्यासासाठी घेतलेली मेहनत आणि धावपळ दूर केली असल्याने आदिवासी महिला आणि ग्रामस्थ यांची पाणी डोक्यावरून आणण्याची वणवण थांबली आहे.

Exit mobile version