आकर्षक छत्र्या, रेनकोट उरण बाजारात दाखल

| उरण। प्रतिनिधी।

पावसाळा सुरू होताच उरण बाजारात शालेय साहित्यासह विविध रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट या पावसाळी वस्तूंनी बाजारपेठेतील दुकाने गजबजली असून याच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.

लहान मुलांच्या रेनकोटमध्ये कार्टूनची प्रिंट असलेल्या रेनकोटला मागणी अधिक आहे. मुलींमध्ये वनपीस, टूपीस आणि पोन्चोलाही मागणी आहे. खरेदीदारांमध्ये ब्रॅण्डेड रेनकोटला सर्वाधिक मागणी आहे. दरानुसार दर्जा असल्याने मध्यम आणि किमान एक पावसाळी हंगाम जाईल, असा रेनकोट खरेदी करण्याकडे लोकांचा अधिक कल आहे.

पावसाळी सँडल, बुट्स, चप्पला देखील खरेदी केल्या जात आहेत. पावसाळी चप्पल, सॅन्डल व बुटांच्या किमती या ब्रँडनुसार आकारल्या जातात. नियमित एक घडी असणार्‍या काळ्या रंगाचे कापड असलेल्या छत्र्यांसोबत आता छत्रीवर पाणी पडताच त्यावरील प्रिंट केलेली पाना-फुलांसह कार्टून चित्रांचा रंग बदलणार्‍या छत्र्यांना मागणी आहे. तरुणांमध्ये हार्ट शेप, विंडो, स्क्वेअर, टू फोल्ड, थ्री फोल्ड, फाइव्ह फोल्ड, टोओपन, क्लोज, वुईथ टार्च, तर महिलांमध्ये सहजरीत्या पर्समध्ये बसतील अशा छत्र्याही बाजारात आहेत.

यंदा मोठ्या आकाराच्या छत्र्या बाजारात आल्या असून एका छत्रीत दोघे जण आरामात पावसापासून बचाव करू शकतात. काही छत्र्यांवर कवितेच्या ओळी लिहिलेल्या तर काहींवर अक्षराची कमाल देखील पाहायला मिळत आहे.

खिशाला परवडणारा पोन्चोस रेनकोटमध्ये शर्ट-पॅन्ट रेनकोटसह वनपीस आणि कुठेही कसाही वापरता येणारा पोन्चू रेनकोटला सर्वाधिक मागणी आहे. एकदाच वापरायचा आणि फेकून द्यायचा असाही रेनकोट अगदी 100 रुपयात बाजारात उपलब्ध आहे. 100 रुपयापासून ते एक हजार रुपयापर्यंत छत्र्या बाजारात उपलब्ध आहेत. फेन्सी किड्स स्टेशनरी, कोरियन, लंच, वाटर बॉटल, असे आम्ही विकत आहे उरण शहरतील सर्वात जुने दुकान आहे, असे मंगल जनरल स्टोअर्सचे ताराचंद जैन यांनी सांगितले.

Exit mobile version