छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घेतले दर्शन
| पेण | प्रतिनिधी |
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच संभाव्य उमेदवार आपापल्या परिने कोणी शिर्डीला, कोणी तिरूपतीला जातो, कोणी पंढरपूरला, कोणी अजमेरला, कोणी मुंब्रादेवीला जातो, तर कोणी हजीआलीपुढे नतमस्तक होतो. कोणी उमेदवार ज्योतिष भविष्य बघतो. परंतु, पेणच्या इतिहासात पहिल्यांदाच उमेदवारी जाहीर होताच अतुल म्हात्रे यांनी सखल हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना व महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या रायगडाला अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगड गाठले.
आजच्या घडीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सांगून मतं तर सर्वच मागतात. परंतु, बोटावर मोजणारी माणसं आहेत जी छत्रपती शिवाजी महाराजांना नावापुरते नाही, तर मनापासून पुजतात. शुक्रवारी (दि. 25) अतुल म्हात्रे यांनी दाखवून दिले की, मी छत्रपतींच्या नावाने राजकारण करणारा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना मनमंदिरात स्थान देणारा शिवभक्त आहे.
अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा ज्येष्ठ नेते आमदार जयंतभाई पाटील यांनी पेण विधानसभा मतदारसंघामध्ये एक उच्च शिक्षित भविष्याचा वेध घेणारा व शेतकर्यांना योग्य न्याय मिळवून देणारा तरूण उमेदवार म्हणून अतुल म्हात्रे यांच्या नावाची घोषणा केली. जयंतभाई पाटील जो शब्द देतात, तो शब्द पूर्ण करतात. शब्दाचा पक्का असणारा माणूस म्हणूनच आज भाईंना अनेक वेळा राजकारणात डावळले जाते. परंतु, भाईंनी त्याची कधीच तमा राखली नाही. अतुल म्हात्रे यांना शब्द दिला होता की, तू शेतकर्यांसाठी लढतोस, तुझ्या या संघर्षाचा विचार केला जाईल आणि भाईंनी त्यांना उमेदवारी दिली. उमेदवारी जाहीर होताच अतुल म्हात्रे देवापुढे अथवा कुणा ज्योतिषापुढे हजेरी लावायला न जाता रायगडावर गेले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक झाले. त्यानंतर अतुल म्हात्रे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी अन्यायाविरूद्ध आणि स्पृश्य-अस्पृश्याच्या लढ्याचा अंत ज्या चवदार तळयाच पाणी हातात घेऊन केले, त्या चवदार तळ्यालादेखील भेट दिली आणि त्या ठिकाणी ही महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन केले. एकंदरीत काय तर, अतुल म्हात्रे यांनी सुरूवात तर राजकीयविरहीत करून पेणकरांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
अतुल म्हात्रे हे राजकारणात नवखे असतील. त्यांना राजकारणाचा अनुभव नसेल; परंतु बळीराजासाठी खूप काही करण्याचे स्वप्न उराशी बाळगून या तरुणाने निवडणुकीच्या रिंगणात पाय ठेवलेले आहेत आणि आज समाजमाध्यमांवर फक्त आणि फक्त अतुल म्हात्रे यांचा बोलबाला आहे. त्यामुळे विरोधकांनीदेखील अतुल म्हात्रे यांची चिंतायुक्त भीती मनात धरली आहे. येत्या निवडणुकीत पेण विधानसभा मतदारसंघात अतुल म्हात्रे यांच्या रूपात नक्कीच बदल पहायला मिळेल.
यावेळी रायगड किल्ल्यावर अतुल म्हात्रे यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, प्रल्हाद पाटील, महेंद्र ठाकूर, निलेश म्हात्रे या खंद्या समर्थकांसह शेकडो तरुण हजर होते.