। हमरापूर । प्रतिनिधी ।
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रूट मार्च केले.
विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन तसेच पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावात तणाव निर्माण होऊ शकतो. याची खबरदारी पोलीस यंत्रणेने आधीच घेतली आहे. याचाच भाग म्हणून दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीतील जोहे, कळवे, दादर, रावे व जिते या गावात रुट मार्च करण्यात आला. रूटमार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, दादर सागरी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नागेश कदम यांच्यासह 1 अधिकारी व 7 अंमलदार तसेच सीआयएसएफचा 1 अधिकारी व 49 जवान सहभागी झाले होते.