म्हाडाच्या 11 हजार घरांच्या किंमती कमी करणार-अतुल सावे

| मुंबई | वृत्तसंस्था |

विक्रीअभावी पडून असलेल्या म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी दिली. घरांच्या किमतींचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचेही सावे यांनी स्पष्ट केले.म्हाडाच्या जवळपास 11 हजार घरांच्या किंमती कमी होणार आहेत. संबंधित घरांचे वीजबिल, पाणीपट्टी भरावी लागत असल्याने म्हाडाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सावे यांनी सांगितले. अशा जवळपास 11 हजार घरांची किमती कमी करुन पुन्हा विक्री करण्यात येणार आहे.

दरम्यान, पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील सदनिकांची सोडत पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत सुमारे 5 हजार 863 सदनिकांची सोडत शुक्रवारी (दि. 24) होणारी होती. ही सोडत प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली असून, लवकरच अर्जदारांना त्याबाबत कळविण्यात येणार आहे.

Exit mobile version