| हमरापूर | प्रतिनिधी |
स्वामी अक्षयानंद महाराज हे अंबाशी, जि. अकोला येथे अनंतात विलीन झाले. ते पेण तालुक्यातील बोरझे गावातील राहिवासी होते. त्यांचे मूळ नाव अनंत रामा म्हात्रे असे होते. ते 7 मार्च 1974 मध्ये गरीबी हटाव योजनेत शिक्षक म्हणून दादर येथे नोकरीला लागले. पण त्यांचे मन शिक्षक पेशात रमत नव्हते. दादर पर्णकुटरीत ते “परमानंद स्वार्मीचा’ सानिध्यात आले. तेथे त्यांना महाराजांनी बोध केला तुम्ही इथे थांबू नका. हरीद्वारला जाऊन अध्यामिक ज्ञान मिळवा. फक्त पाच महिने नोकरी करून ते पुढे हरीद्वारला पोहोचले. तेथे यांनी अध्यात्म व बेदांताचा अभ्यास केला. हिमालयात जाऊन तपश्चर्या केली. पुढे ते स्वामी गंगदेव महाराजांच्या सानिध्यात आले. स्वामी गंगदेकींनी त्यांना “ अक्षयानंद सरस्वती हि उपाधी दिली. त्यानंतर त्यांना समाजद्वारासाठी आपण जा येथे राहू नका. ते अंबाशी अकोला येथील नन्हाळे गुरुजींच्या सानिध्यात आले, तेथे त्यांनी शेकडो एकर जमीन महाराजांना दिली. पाण्याची व्यवस्था करत नापीक जमिनीत मोती पिकवले. ते हाडाचे शिक्षक असल्याने त्यांनी लव्हाळे गुरुजीबरोबर शाळेतील मुलांना योगदान म्हणून शिकवले. व्यसनावर प्रबोधन केले.
स्वच्छतेवर प्रबोधन करून स्वच्छता उपक्रम राबविला. अंबाशीत धार्मिक पागचे धडे तेथील समाजावर गिरवले. आश्रमात भाजीपाला पिकवला, अनेक गायी ठेवून गोशाळा उभारली. एका उक्तीत म्हटले आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती“ याप्रमाणे कार्य केलं. जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला या सानेगुरुजींच्या उक्तीप्रमाणे 70 व्या वर्षी यांचे देहावसान झाले. पेण तालुक्यासह रायगडातील भक्त त्यांना भेटण्यासाठी अंबाशी, अकोले येथे जात असत. त्यांच्याबद्दल एवढेच म्हणता येईल“ झाले बहु, होतील परंतु यासम तेच. त्यांचे उत्तर कार्य अंबाशी, अकोला येथे गुरुवार 29 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहेत.