| पनवेल | वार्ताहर |
डिझेलजन्य ज्वलनशील पिवळसर द्रव्य पदार्थाचा मुद्देमाल जप्त केला असून त्याचा लिलाव तळोजा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 700 लिटर डिझेल जन्य ज्वलनशिल पिवळसर द्रव्य पदार्थ असा मुद्देमाल तळोजा पोलिसांनी जप्त केला आहे. हा मुद्देमालाचा जाहीर लिलाव दि.7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तळोजा पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी तत्पूर्वी तळोजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रवीण भगत यांनी केले आहे.