तिसर्‍याच दिवशी कांगारूंचा धुव्वा

भारताचा एक डाव 132 धावांनी विजय, मालिकेत 1-0 अशी आघाडी

| नागपूर । वृत्तसंस्था ।

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपुरात पार पडला. शनिवारी पार पडलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने पहिल्या डावाच्या जोरावर 223 धावांची आघाडी घेतली होती. परंतु दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ 32.2 षटकात 91 धावांवर आटोपला. भारताकडून आर आश्‍विनने सर्वाधिक आठ विकेट्स घेत आस्ट्रेलिया संघाला खिंडार पाडली. भारतीय संघाने आता चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या डावात 400 धावा केल्यानंतर टीम इंडियाला 223 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या डावात सातत्याने विकेट गमावल्या. परिणामी तिसर्‍या दिवशीच संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने 51 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 25 धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून आर आश्‍विनने सर्वाधिक पाच विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऑस्ट्रेलिया संघाला महागात पडला. त्याचा सर्व संघ 63.5 षटकांत 177 गुंडाळला. ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने 49 धावा केल्या. अशा पद्धतीने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघातील एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजाने सर्वाधिक पाच विकेट्स घेत ऑस्ट्रेलिया संघाला सुरुंग लावण्याचे काम केले.

भारताचा पहिला डाव –
भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 400 धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 212 चेंडूचा सामना करताना 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 120 धावांचे योगदान दिले. तसेच रवींद्र जडेजा (70) आणि अक्षर पटेल (84) धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाकडून गोलंदाजी करताना टॉड मर्फीने सर्वाधिक सात विकेट्स घेतल्या.

Exit mobile version