ऑस्ट्रेलियाचा 41 चेंडूत विजय

| कॅनबेरा | वृत्तसंस्था |

एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. जेवियर बार्लेटचा भेदक मारा आणि जेक फ्रेजर-मॅकगर्क आणि जोश इंग्लिस यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल 259 चेंडू राखून विजय मिळवला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू राखून सामना जिंकणार्‍यांच्या यादीत हा विजय सातवा ठरला. सर्वाधिक चेंडू राखून सामना जिंकण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. 1979 मध्ये इंग्लंडने 277 चेंडू राखून सामना जिंकला होता. त्यानंतर श्रीलंका दुसर्‍या क्रमांकावर असून त्यांनी 2001 मध्ये झिम्बॉब्वेवर 274 चेंडू राखून विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करणार्‍या वेस्ट इंडिजला अवघ्या 24.1 षटकात 86 धावात गुंडाळलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 87 धावांचं आव्हान फक्त 6.5 षटकात पूर्ण केलं. जेक फ्रेजर-मॅकगर्कने 18 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत 41 धावा चोपल्या. तर जोश इंग्लिशने 16 चेंडूत 35 धावा केल्या. यात 4 चौकार आणि एक षटकार मारला.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणार्‍या वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. तिसर्‍याच षटकात 13 धावांवर त्यांचा पहिला धक्का बसला. तर त्यानंतर 38 धावांवर दुसरा गडी बाद झाला. यानंतर फलंदाजांनी फक्त मैदानावर हजेरी लावली. एलिख अथांजे वगळता इतर सहा फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाही. ऑस्ट्रेलियाच्या जेवियर बार्लेटने 21 धावा देत 4 विकेट घेतल्या. तर लान्स मॉरिस आणि एडम झाम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. सीन एबॉटला एक विकेट मिळाली.

Exit mobile version