भारत दौर्‍यासाठी महिला ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

उदयोन्मुख स्टार फलंदाज जॉर्जिया वॉलला ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे. ती पुढील महिन्यात भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेत पदार्पण करेल. अशातच कर्णधार अ‍ॅलिसा हिलीला गुडघ्याच्या दुखापतीमुळे तीन सामन्यांच्या या मालिकेला मुकावे लागणार आहे. अ‍ॅलिसा हिलीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ताहलिया मॅकग्राथ ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळणार आहे.

अ‍ॅलिसा वेलिंग्टनमधील न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन करेल अशी शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला डब्लूबीबीएल 10 स्पर्धेत गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे हिलीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. ऑस्ट्रेलियन कर्णधार आधीच पायाच्या दुखापतीमुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप
स्पर्धेच्या शेवटी बाहेर पडली होती.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटने शनिवारी मागोमाग मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी संघ जाहीर केले. ज्यामध्ये युवा खेळाडू जॉर्जिया वॉल भारताविरुद्ध फोबी लिचफिल्डसह सलामी फलंदाजी करेल, असे स्पष्ट केले होते. क्वीन्सलँड आणि सिडनी थंडरची 21 वर्षीट सलामीवीर जॉर्जिया वॉल ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये चांगली चर्चेत आहे. तिने हंगामात 9 डावात 145.85 च्या सरासरीने 299 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर महिला राष्ट्रीय तिने वन-डे क्रिकेट लीगमध्येही चांगली कामगिरी केली. तिने 2024-25 हंगामात 41.72 च्या सरासरीने 459 धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया संघ: ताहलिया;मॅकग्राथ (कर्णधार), अ‍ॅश गार्डनर (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, किम गर्थ, अलाना किंग, फोबी लिचफील्ड, सोफी मोलिनक्स, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शट, ;एनाबेल;सदरलँड, जॉर्जिया व्हॉल, जॉर्जिया वेअरहॅम.
भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तितास साधू ,अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर , सायमा ठाकोर.

भारतविरूद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना
: 5 डिसेंबर
( दुपारी 3.20 वाजता)- ब्रिसबेन
दुसरा सामना : 8 डिसेंबर
( सकाळी 10.45 वाजता)- ब्रिसबेन
तिसरा सामना : 11 डिसेंबर
(दुपारी 3.20 वाजता) - ब्रिसबेन.
Exit mobile version