सिक्कीममध्ये हिमस्खलन; सहा पर्यटकांचा मृत्यू

11 जखमी, 80 जण अडकल्याची भीती

| गुवाहाटी | वृत्तसंस्था |

सिक्कीममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गंगटोक येथे मंगळवारी (दि. 4) हिमस्खलन झाले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये सहा पर्यटकांचा मृत्यू झाला असून, 11 जण जखमी झाले आहेत. तर, 100 हून अधिक पर्यटक बर्फात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.

गंगकोट येथली नाथुला परिसरात दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. जवाहारलाल नेहरु रोडवरील 15 व्या मीलवर हे हिमस्खलन झाले आहे. येथे 150 पर्यटक होते, असा अंदाज आहे. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला. 30 पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यात 11 जखमी आहे. अन्य 80 पर्यटक हिमस्खलनात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

अचानक हिमस्खलन झाल्याने पर्यटकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव सुरु केली. मात्र वेगाने झालेल्या भूस्खलनात पर्यटक अडकले. येथे तात्काळ बचावकार्य सुरु झाले. बर्फात अडकलेल्या सहा जणांना गंगटोकच्या एसटीएनएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. घटनास्थळी सिक्किम पोलीस, सिक्किम ट्रॅव्हल असोसिएशन, पर्यटन विभागाचे अधिकारी व वाहन चालक बचावकार्य करीत आहेत.

Exit mobile version