। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी येथील रहिवाशी अविनाश पडवळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 45 वर्षांचे होते. अविनाश नारायण पडवल हे बारवई गावचे मनसेचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबियासह रसायनी बारवई परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. अविनाश पडवळ यांच्या पश्चात त्यांच्या मातोश्री, भाऊ, पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. अविनाश पडवल यांचा दवक्रीया विधी 28 जून रोजी श्री क्षेत्र उद्धर रामेश्वर येथे होणार असून उत्तरकार्य 1 जुलै रोजी बारवई येथील राहत्या घरी होणार आहेत.






