फटाके टाळा; दिव्यांचा उत्सव साजरा करा!

राज्य सरकारचे आवाहन

। अलिबाग । विषेश प्रतिनिधी ।

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही धोका कायम आहे. उत्सवाच्या काळात गर्दीमुळे संसर्ग वाढण्याचा धोका असतो त्यामुळे यंदाचा दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात करावा, फटाके फोडण्याचे टाळावे. दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारने आज केले आहे.यावर्षी 2 ते 6 नोव्हेंबर या काळात दिपावली उत्सव साजरा होणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने कपडे, फटाके, दागिने व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात व रस्त्यांवर गर्दी होते. त्यामुळे राज्य सरकारने काळजी घेण्याचे आवाहन करीत राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून लोकांनी सर्व धर्मीय सण-उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने आणि एकत्र न येता साजरे केले आहेत. कोरोनाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी मोठया प्रमाणावर एकत्र येऊन गर्दी उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. त्यामुळे उत्सव साजरा करताना नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे.प्रकाशाचा उत्सवदिवाळीत मोठया प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी होते. यामुळे वायू व ध्वनी प्रदूषण वाढते. त्याचे परिणाम दिवाळीनंतर पुढे काही काळार्यंत दिसतात. कोरोनाचे रुग्ण व कोरोनावर मात केलेल्यांनाही या धुरामुळे वायू प्रदूषणाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन सरकारने केले आहे.
सुचनांचे पालन कराधार्मिक स्थळे सुरू असली तरी दिवाळी उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा करा. दिवाळीच्या खरेदीसाठी दुकानात- रस्त्यावर गर्दी टाळावी. ज्येष्ठ नागरिक व बालकांनी घराबाहेर पडणे टाळावे.

Exit mobile version