तरुण वर्गांची नविन फटाके घेण्याला पसंती
। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
2 नोव्हेंबर , दिवाळी चा सण मोठा आनंदाला नाही तोटा,या ओळीच्या माध्यमातून दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. दिवाळी सणांस प्रारंभ झाला असून या मध्ये गोड धोड समवेत फटाक्यांची यादी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे.गरीब असो अथवा श्रीमंत प्रत्येक जण दिवाळी साजरी करीत असतो यामुळे फटाक्यांचे महत्त्व कमी होत नसल्यांचे दिसून येत आहे.बाजार पेठ असो अथवा ग्रामीण भागातील दुकाने फटक्यांनी सज्य झाल्या आहेत.
लहान मुलांना वेध लागत असतात की आपण फटाके केव्हा फोडणार? कारण दिवाळी सण हा फटाके फोडल्याशिवाय दिवाळी सण साजरा झाल्यासारखे वाटत नाही.यामुळे बाजार पेठेत फटाक्यांचे विविध प्रकार दाखल झाले आहे.पाऊस असो अथवा भूईचक्कर टोमबॉम,लवंगी फटाके तसेच विविध प्रकारच्या फँशी टम बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.
प्रत्येक मुलांच्या आवडी नुसार प्रत्येक पालक वर्ग फटाके खरेदी करीत आहेत.दिवाळीचा हा मांगल्याचा उत्सव फक्त दिव्यांच्या लखलखाटांनी आणि शुभेच्छांनीच साजरा करण्यासाठी असल्यामुळे हा उत्सव असलेली दिवाळी हा सण सुरु झाल्यामुळे दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या कपडे, मिठाई, दिवे व इतर पूजासाहित्याची खरेदी करण्यात येत आहे.परंतु या मशॉपिंग लिस्टफमध्ये फटाक्यांचा समावेशही मोठया प्रमाणात असल्याचे पहावयास मिळत आहे.