इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळा

पोलीस निरिक्षक शिरीष पवार यांचे मार्गदर्शन
। खोपोली । प्रतिनिधी ।
सायबर गुन्हे घडताना सोशल मिडीया, फेसबुक, इस्टा, टेलिग्राम सारख्यांवर आपली खरी माहिती देत असतो सर्व पोस्ट पाठवत असतो. त्यामुळे सायबर गुन्हे घडत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी मोबाईल तंत्रज्ञानाच्या भानगडीत पडू नका, जागृत रहा, रोखीने व्यवहार करा करण्याचे अवाहन करीत खोपोली साबर गुन्हेमुक्त करण्यासाठी शाळा, महाविद्यालय तसेच सर्व भागात जनजागृती करणार असल्याचे खोपोलीचे पोलीस निरिक्षक शिरीष पवार यांनी सांगितले.
सायबर गुन्ह्यांसंबधीची माहिती आणि जनजागृती करण्यासाठी दक्षता कमिटी सदस्या अंजू सरकार यांनी विणानगर मधील गार्डनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खोपोलीचे पोलीस निरिक्षक शिरीष पवार प्रमुख मार्गदर्शक होते. याप्रसंगी व्यासपीठावरील माजी नगराध्यक्षा सुमन औसरमल, माजी ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल यांचे विणानगर रहिवासी संघाचे अध्यक्ष महादेव पवार, मधुकर पंडीत, रंजना सावंत यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी विणानगरमधील सुरेश सावंत, अनुरूद्ध दातार, पांडूरंग ढेरे, विनोद मोरे, शंकर सरकार, लक्ष्मीकांत खरे, रेशम जान, सुषमा पांगारे, प्रतिभा बुरूमकर, पुष्पा पालवे आद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी जागृत राहणे गरजे आहे. आपण क्रेडीकार्ड, डेबिटकार्ड घेते पण त्याची परिपूर्ण नसते तसेच रोखीने किंवा चेकने पैसे देण्यापेक्षा क्रेडीकार्ड वापरणे फॅशन झाली आहे. सायबर गुन्हे हे सोशल मिडियावरील फेसबुक, इस्टा, व्हॅट्सअप, टेलिग्राम इतर माध्यम डाऊनलोड करताना आपली खरी माहिती देत असतो, त्यामुळेच आपले फेक आकाऊंट बनवूच आफली फसवणूक होते. ऑनलाइन कोरोना लसीकरण, परिक्षेचा फार्म भरताना पैसाची लुट होत आहे, वाहनाची दंड पावती भरण्यासाठी कॉल, फेसबुक लाईव्ह व्हिडिओ चॅट करताना आपली रेकार्डिंग करून ब्लॅकमेलिंग करणे आदी सायबर गुन्हेगारी विषयी शिरीष पवार यांनी माहिती दिली.

Exit mobile version