चौल-रेवदंडा मार्गावरून प्रवास टाळा; हे आहे कारण …

। अलिबाग । वार्ताहर ।
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अलिबाग आणि मुरुड तालुका हा नेहमीच गजबजलेला असतो. अनेक पर्यटक शनिवार-रविवार अलिबाग व मुरुडला भेट देत असतात. येथील समुद्रकिनारे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. परंतु वाढत्या पर्यटकांमुळे अलिबाग व मुरुड मार्गावर वाहतूककोंडी वाढत चालली आहे. आजही रेवदंडा-चौल मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी झाली असून गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही वाहतूककोंडी स्थानिकांसाठी डोकेदुखी बनत चालली आहे तर अलिबागहून रेवदंडा मुरुडकडे जाणारी वाहतूक ठ्ठप झाल्याचं दिसून येत आले. स्थानिकांना या मार्गावरून प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version