। खांब-रोहे । वार्ताहर ।
तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब शिक्षण संस्थेचे श्रमिक विद्यालय चिल्हे येथे वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस तथा मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी जेष्ठ शिक्षक नरेंद्र माळी, आर.के.म्हात्रे, शिवनाथ दराडे, संजय आंधळे, अमोघसिद्ध सुरवसे, महेंद्र जवरत, सुनील थिटे, अमित डाके, पांडुरंग शिद, अनुराधा मोरे, ज्योत्स्ना सबरदंडे, प्रविण मरवडे, रामदास नवघरे, चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम मुख्याध्यापक दिपक जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. मराठी भाषेची महती, महत्त्व व अस्मिता विद्यार्थी वर्गाचे अंगी रूजावी तसेच भाषेचे अभिमान असावे यासाठी शिक्षक वर्गानी भाषेची महती सांगतानात व्यवहारात नेहमीच आपल्या मातृभाषेचा वापर करावा, असे अवाहन केले. तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पारंपरिक गीतांवर मराठी अस्मितेचे सादरीकरण केले.