मराठीचा गौरवोद्गार करणार्या सारस्वतकारांना अभिवादन
विविध उपक्रमांद्वारे निजभाषेचे महत्त्व केले अधोरेखित
मराठी भाषेचा मुक्तकंठाने गौरव करत, तिचे महत्त्व अधोरेखित करणार्या ज्ञानपीठ पुरस्कारार्थी कवीवर्य कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती ही मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येते. या दिनानिमित्त संपूर्ण रायगड जिल्ह्यात माय मराठीचा जागर करताना कुसुमाग्रजांसह मराठीचा गौरवोद्गार करणार्या सारस्वतकारांना अभिवादन करण्यात आले आहे. तसेच विविध उपक्रमांद्वारे निजभाषेचे महत्त्व केले अधोरेखित करण्यात आले आहे.