प्रवचनकार पांडुरंग मारणे यांना पुरस्कार जाहीर

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील वावे तर्फे निजामपूर गावाचे रहिवासी तथा सेवानिवृत्त वायरमन पांडुरंग बाबू मारणे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 जाहीर झाला, असल्याची माहिती निवड पत्र पाठवून फाऊंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार संजय पवार व रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे गुरुजी यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण रविवार, (दि.12) मे रोजी सकाळी 11 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, बाजी प्रभू देशपांडे चौक, पन्हाळगड, जि. कोल्हापूर येथे होणार आहे.

पांडुरंग मारणे हे माणगाव तालुक्यातील वावे तर्फे निजामपूर गावाचे रहिवासी असून, सामाजिक कार्यात नेहमीच ते सहभागी होत असतात. कीर्तन व प्रवचन करून ते समाजाला आध्यत्मिकतेचे ज्ञान देऊन समाज प्रबोधन करीत असतात. त्यांना यापूर्वी माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनिय कार्याची दखल उपरोक्त संस्थेनी घेऊन त्यांची राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2024 करिता निवड जाहीर करण्यात आली आहे.

Exit mobile version