| सोगांव | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा रायगड यांनी आयोजित केलेल्या गुणवंत शिक्षक म्हणून मूनवली येथील अजित हरवडे यांची निवड करण्यात आली. त्यांना भाग्यलक्ष्मी हॉल अलिबाग येथे शिक्षक समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. त्या निवडीबद्दल यांच्या निवासस्थानी ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वस्सीम कुर, जगदीश सावंत, जगदीश बारे, अनंत सकरे, गुळेकर, सुनिल अनमाने, राजेश परब, इलियास हाफिज, अजित घरत आदी मान्यवरांनी जाऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.