खोपोली पोलीस स्टेशनतर्फे विघ्नहर्ता पुरस्काराचे वितरण

पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची उपस्थिती
। खोपोली । प्रतिनिधी ।
कोरोना काळात शासनाच्या नियमांचे पाळन करीत गणेशोत्सव साजरा करणार्‍या मंडळासाठी खोपोली पोलीस स्टेशन आयोजित विघ्नहर्ता पुरस्कार 2021 स्पर्धा आयोजित करण्यात आली. पारितोषक वितरण सोहळा रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या उपस्थितीत कॅम्पोलिएन रिसार्ट येथे संपन्न झाला आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुकला, खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, रसायनीचे पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे, नगरसेवक, पोलीस पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. विघ्नहर्ता पुरस्कार प्रदान उत्तेजनार्थ पहिला साई गणेश मित्र मंडळ सुभाषनगर, दुसरा गणेशोत्सव मंडळ मिळ ठाकूरवाडी, सर्वोत्कृष्ट सामाजिक उपक्रम पहिला बापदेव मित्र मंडळ विहारी खोपोली, दुसरा हनुमान मित्र मंडळ सारसन, उत्कृष्ट गणेशमूर्ती वर्धमान मित्र मंडळ वर्धमान नगर खोपोली, उत्कृष्ट देखावा पहिला बाळ मित्र मंडळ वरची खोपोली, दुसरा मोरया सांस्कृतिक मंडळ काटरंग उत्कृष्ट गणेशोस्तव मंडळ, कै.पांडुरंग स्मृती एकता मित्र मंडळ साजगाव, दुसरा तरुण मित्र मंडळ, प्रकाशनगर खोपोली मधील सामाजिक कार्य पुरस्कार अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुनाथ साठेलकर, सहजसेवा फाऊंडेशन शेखर जांभळे, खोपोली अक्ट अल्टा लॅबोरटरीस डायरेक्टर आदित्य धोटे, जनरल मॅनेजर बी.एस.म्हात्रे यांच्यासह परिक्षकांचा सन्मान करण्यात आले. तर खोपोली शहरातून चोरीला गेलेले मोबाइल चोरांसह पकडून देणारे पोलिस शिपाई प्रदिप खरात आणि प्रविण भालेराव यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोबाइल लोकार्पण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांनी केले.

Exit mobile version