| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा 11 वा वर्धापन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार असो. तर्फे देण्यात येणारा कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार सुतारवाडी येथील पत्रकार हरीश्चंद्र महाडिक यांना, उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार महाड येथील मनोज खांबे यांना तर युवा पत्रकार पुरस्कार गोरेगाव(माणगाव) येथील पत्रकार गिरीश गोरेगावकर यांना शाल, सन्मानचिन्ह व रोख रक्कम या स्वरुपात खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मठाधिपती गुरुदास अनंत महाराज जांबेकर, शबाना मुल्ला, पंचकर्म वैद्य शिवराम भोईर, मारुती राणे, जाणू वारगुडा, निवेदक संतोष ताडकर, गायक महेंद्र कोंडे, निवृत्त वाहतूक नियंत्रक चंद्रकांत भोईर, अि अमोल पांडुरंग गायकर, धीरज यशवंत हळदे, विशाखा विनोद अंबाडे व . सुचिता आकाश मढवी यांचा सन्मानही े करण्यात करण्यात आला.
या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, हरिश काळे, मधुकर ठमके, भाई टके, डॉ. राजेंद्र धात्रक, अशोक मोकल, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, पिगोंडेचे सरपंच संतोषभाई कोळी, पाटणसईच्या सरपंच माधवी गायकर, वणीच्या सरपंच प्रगती आवाद, ऐनघरच्या सरपंच कलावती कोकळे, वरवठणेच्या सरपंच ॠतुजा म्हात्रे, पळसच्या सरपंच परिक्षा घासे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब टके, काँग्रेसचे शहराध्यक्ष अशपाक पानसरे, भाजपा शहराध्यक्ष सचिन मोदी आदींसह अनेक मान्यवर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक पत्रकार असो.चे अध्यक्ष अॅड. महेश पवार यांनी तर सूत्रसंचालन अमरजा लिमये यांनी केले.