| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुका बुरुड समाज या संस्थेचा 42 वा.वर्धापन दिन कुंभार वाड्यातील गावदेवी जरीमाता सामाजिक सभागृहात बुरुड समाजाचे रायगड जिल्हाध्यक्ष रुपेश जामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष अशोक करंबत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी सिद्धीताई मोरे , सुदीन सावंत, राजेश मोरे, राजेश खैरे, संदेश नागे, अशोक करंबत, सुधीर नागे,दीपक तेलंगे, राकेश किल्लेकर, नंदकुमार सोनकर, सुजन खैरे, महेंद्र सोनकर, दिलीप जामकर,उदय किल्लेकर, विजय महाले, द्वारकानाथ गायकवाड, महेश जामकर, महेश साळुंखे, मनोहर किल्लेकर, निलेश गायकवाड ,संध्या नागे, उपस्थित होते. नंदकुमार सोनकर यांनी प्रास्ताविक केले.यावेळी सुधीर नागे ,रुपेश जामकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण करण्यात आले. मेळाव्यासाठी अशोक करंबत,राजेंद्र जामकर, सुधीर नागे, नंदकुमार सोनकर महेंद्र सोनकर, दीपक तेलंगे, राकेश किल्लेकर द्वारकानाथ गायकवाड, सुजन खैरे,विजय महाले, दिलीप जामकर, उदय किल्लेकर, महेश जामकर, मयूर साळुंखे, मनोहर किल्लेकर, निलेश गायकवाड तसेच संस्थेचे गटकार्यकर्ते यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.